निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंन्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणूक संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डीग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी जारी केले आहेत.
000000

You cannot copy content of this page