भाजपच्या बांदा मंडल उपाध्यक्षपदी संदिप बांदेकर यांची फेर नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१६-: भारतीय जनता पार्टी बांदा मंडलची युवा मोर्चा कार्यकारणी निवड करण्यात आली. भाजपा युवा मोर्चाची सावंतवाडी मध्ये झालेल्या बैठकीत भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग यांनी नियुक्ती केली.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब , बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा बांदा मंडळ तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, परिक्षित मांजरेकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page