बाबुराव धुरी: उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही; वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य..
सावंतवाडी ता.१६-: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा पराभव करून सावंतवाडी मतदार संघात तिसऱ्यांदा भगवा फडकविण्याचा आमचे ध्येय असल्याचे मत उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. उमेदवारा बाबत वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असून, गद्दाराणा धडा शिकवणे हेच एकमेव ध्येय असून, केसरकरांना धडा शिकवणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याचे काही माध्यमांवरून सर्वत्र पसरले असले तरी त्यात कोणत्याही प्रकारचे तथ नसून, अद्याप जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे. त्यामूळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले आहे. यावेळी जिल्ह्यातील कोणते नेते मातोश्री च्या संपर्कात आहेत. याची आपल्याला कल्पना नाही. परंतु, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीतून अर्चना घारे परब यांना जरी उमेदवारी दिली तरी आपली काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर शिवसेना ही संघटना आदेशावर चालते. पक्षप्रमुखांच आदेश मानून शिवसैनिक काम करतो. राजन तेली पक्षात आले तर स्वागतच आहे. त्यांच्याबाबतीतली भुमिका हे पक्षप्रमुख घेतील. संघटना मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. राजन तेली यांना संघटनेनं उमेदवारी दिली तर त्यांचे काम करणार अशी माहिती धुरी यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
