सातेरी मंदिर ओहोळावर नागरिकांसाठी बेंचेस…

ठाकरे शिवसेनेच्या पूनम चव्हाण, मनोज मोंडकर यांचा उपक्रम..

मालवण दि प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण आणि मनोज मोंडकर यांच्या पुढाकारातून मालवण शहरातील प्रभाग क्र. ९ मध्ये सातेरी मंदिर ओहोळावरील पुलावर नागरिकांच्या मागणीनुसार दोन बेंचेस बसवण्यात आले.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. पूनम चव्हाण, मनोज मोंडकर, उमेश चव्हाण, नागेश चव्हाण, गणेश मराळ, प्रसाद चव्हाण, संतोष मराळ, विजय यादव, विश्वास परब, बबन आचरेकर, दीपक चव्हाण, पिंटो घाडी, पांडू चव्हाण, सुहास वालावलकर, मयू मराळ, अक्षय घाडी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page