वरिष्ठांकडे राजन तेलींनी मांडले म्हणणे..
⚡सावंतवाडी ता.०४-: विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी आपण इच्छुक आहे तशा प्रकारची मागणी ही आपण वरिष्ठांकडे केलेली आहे परंतु युतीचा धर्म लक्षात घेता त्या ठिकाणी केसरकर यांना पुन्हा संधी देऊ नका त्यांच्या बदल्यात या ठिकाणी कोणीही उमेदवार दिल्यास आपण त्यांचा प्रचार करू अशी मागणी वरिष्ठांकडे केलेली आहे याबाबत येत्या आठ दिवसात निश्चितच निर्णय होईल. अशी माहिती माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली.
दरम्यान वरिष्ठपातवर तुम्ही युती करत असताना स्थानिक पातळीवर माझ्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी कोणासोबतही फरफटत जायच का ? याचाही विचार वरिष्ठांनी करावा असेही आपण सांगितल्याच तेली यांनी स्पट केले.
