समाजमंदिर परिसराची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती बसविण्यात येणारी रेलिंगची पार्श्वभूमीवर

*सावंतवाडी-:* समाज मंदिर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती नगरपालिका प्रशासनाकडून नव्याने बसविण्यात येणाऱ्या रेलिंग ची नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या परिसरात रंग रंगोटीचे काम सुरू असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती असलेले रेलिंग तुटून गेल्याने नव्याने रेलिंग बांधण्यात आले आहे. या कामाची नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली आहे. यावेळी बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page