⚡बांदा ता.०३-: नवरात्रोत्सावनिमित्त रविवार दिनांक ६ रोजी बांदा शहरात सकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोर्येवाडा, श्री देव पाटेश्वर मंदिर, आळवाडी नवरात्रौत्सव मंडळ, आळवाडा बाजारपेठे मार्गे सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रौत्सव कट्टा कॉर्नर मंडळ येथे भेट देऊन सार्वजनिक नवरात्रौत्सव निमजगावाडी येथे दुर्गा मातेचे दर्शन घेऊन दौड पुन्हा कट्टा कॉर्नर येथे येणार आहे. त्यानंतर याठिकाणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या दुर्गा माता दौड साठी बहुसंख्य संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गा माता दौडच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बांद्यात नवरात्रोत्सावनिमित्त रविवारी ६ रोजी ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन…!
