महात्मा गांधी दिवशी आंबोलीतील नागरीकांनी केली गावठणवाडी शाळा नं.६ च्या परीसरातील स्वच्छता…

⚡सावंतवाडी ता.०३-: महात्मा गांधी जयंती ‘2 ऑक्टोबर’ या दिवशी आंबोली येथील फौजदारवाडी गावठणवाडी व रमाईनगरच्या नागरिकांनी स्वच्छता हीच देवी मानून परिसर स्वच्छता केली. यासाठी सर्वप्रथम तीनही वाड्यांमधील नागरिक जि. प. शाळा गावठणवाडी नं. 6 येथे उपस्थित राहून शालेय परिसर स्वच्छ केला. शालेय मैदान, आसपासचा परिसर, रस्ते यांची सर्व नागरिकांनी साफसफाई केली. त्यानंतर आंबोली गावची ग्रामदेवता श्रीदेवी माऊली मंदिर परिसराचीही सर्व नागरिकांनी स्वच्छता केली.

आंबोली गावामध्ये होणाऱ्या कोणत्याही उत्सवामध्ये या तीनही वाड्यातील नागरिकांची एकजूट अशीच कायम पाहायला मिळते. स्वच्छता मोहीम आम्ही या अगोदरही राबवत आलेलो आहोत तसेच यानंतरही राबवू असे सर्व नागरिकांनी आश्वासन दिले.

You cannot copy content of this page