स्नेह दृढ करणारा क्षण म्हणजे संदीप गावडे यांचा वाढदिवस…!

युवानेते विशाल परब यांचे अलौकिक मित्रप्रेम

⚡सावंतवाडी ता.०२-: पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे यांचा वाढदिवस यंदा एका खास आणि भावनिक सोहळ्याच्या साक्षीने साजरा झाला. युवानेते विशालभाई परब यांनी आपल्या जिवलग मित्राला दिलेल्या शुभेच्छा आणि उपस्थितीत या सोहळ्याला खास सौंदर्य प्राप्त झाले. युवानेते विशाल परब यांनी स्वतः संतोष यांना घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. संतोष आणि विशालभाईंच्या मैत्रीचा अनमोल ठेवा, परस्परांबद्दलचा आदर आणि स्नेह यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रसंगी उपस्थितांना झाले. यावेळी विशालभाई परब म्हणाले की, संतोष म्हणजे जिवाभावाचा सवंगडी होय. अनेकदा माझ्या एका हाकेवर सदैव उपस्थित राहणारे असे व्यक्तिमत्व आहेत. आमची ही मैत्री अजून दृढ होऊन पुढेही अशीच टिकावी, हीच सदिच्छा!
यावेळी संतोष गावडे यांनी सुद्धा भावुक होऊन आपल्या मित्राचे कौतुक केले आणि आपल्या वाढदिवसाचा हा अनमोल सोहळा कधीच विसरणार नाही, असे सांगितले.

You cannot copy content of this page