मंत्री दीपक केसरकर यांची गॅरंटी संपली…

प्रवीण भोसले: माझा वैयक्तिक वाद नाही, मात्र मंत्रिपद भोगूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याची व्यक्त केली खंत..

⚡सावंतवाडी ता.०२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी संपली त्याचप्रमाणे मंत्री दीपक केसरकर यांचीही गॅरंटी संपलेली आहे. मल्टीस्पेशालिटी संदर्भात ते कसे युवराज लखमराजे भोसले यांचा वापर करतील हे त्यांनाही समजणार नाही अशी टीका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज येथे केली.

ते म्हणाले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे येथील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्चना घारे याच आमच्या उमेदवार राहणार आहेत निवडून आणण्यासाठी मला सगळ्यांचीच गरज लागणार आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्याशी माझे वैयक्तिक कसलेच वाद नाहीत मात्र आजपर्यंत केसरकर यांनी मंत्रिपदे भोगूनही म्हणावा तसा मतदारसंघाचा काहीच विकास केलेला नाही.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,अनंत पिळणकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page