दोघांमध्ये पाऊण तास चर्चा..?: सूत्रांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोटातून जोरदार हालचाली सुरू असून भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार राजन तेली यांनी नुकतीच राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तब्बल दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे मात्र करू शकले नाही, पण राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठी सावंतवाडी मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतात याची उत्सुकता मात्र सर्वांना लागली आहे.
