राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये कळसुलकर शाळेचे शिक्षक धोंडी वरक यांचे सुयश…

⚡सावंतवाडी ता.०२-: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र मार्फत आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा- 2023 मध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.धोंडी गंगाराम वरक यांनी तालुका स्तरावर दोन गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले.

त्याबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा पार पाडण्यासाठी ई- साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळां मधील शिक्षकांसाठी ही स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी अनेक शिक्षक यामध्ये सहभागी झालेले होते. कळसुलकर शाळेचे श्री वरक यांनी इयत्ता तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी या गटासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली होती. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातून त्यांना दोन्ही गटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यानिमित्त सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.शैलेश पई, सचिव डॉक्टर नार्वेकर, सर्व संचालक, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत,हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भुरे सर,सर्व शिक्षक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page