स्वच्छता हे सेवा अंतर्गत शौचालयाचे उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी)-:ग्रामपंचायत मिठमुंबरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पतंप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय शेजारील सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन सरपंच बाळकृष्ण गांवकर व उपसरपंच गुरुनाथ गांवकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल गांवकर ,संदिप मुंबरकर, सरीता वाघट , ग्रामपंचायत अधिकारी आर. एस. गोवळकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल मुंबरकर , मुख्याध्यापक मधुसूदन घोडे ,उपशिक्षक सुरेश साळुंखे ,आशा सेविका स्वाती गांवकर ,अंगणवाडी सेविका सखुबाई गांवकर, रविना मुंबरकर,मदतनीस रक्षिता गांवकर, अनुष्का मुंबरकर , ग्रामस्थ जगदीश गावकर ग्रा. पं. डाटा ऑपरेटर विनिता मुंबरकर , नळकामगार दिपेश गावकर,मुख्यमंत्री युवा मधील डाटा ऑपरेटर विद्याधर गांवकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक मधुसूदन घोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा गोवळकर यांनी व्यक्त केले .

You cannot copy content of this page