साळेल येथील गिरोबा मंदिरात भजन महोत्सवाचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील साळेल येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३ ते १० ऑक्टोबरपर्यंत रात्री ८ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवांची भजने सादर होणार आहेत.

पहिला दिवस दि. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुळकरवाडी नं. २ साळेल बुवा नीलेश गावडे, पखवाज- गौरांग गावडे, रात्री ९ वा. भगवती प्रासादिक भजन मंडळ, मुणगे देवगड-बुवा वैभव शेट्ये, पखवाज शैलेश सावंत, रात्री १० वा. सद्‌गुरू भजन मंडळ कुडाळ – बुवा वैभव सावंत पखवाज-निखिल पावसकर, ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ स्थळकरवाडी साळेल बुवा अमित गावडे, पखवाज-प्रणय गावडे, रात्री ९ वा. श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड- बुवा संदीप लोके, पखवाज-योगेश सामंत, रात्री १० वा. श्री रामेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ तळगाव-बुवा प्राची दळवी, पखवाज-ओंकार दळवी, ५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ वरचीवाडी साळेल-बुवा कमलेश साळकर, पखवाज-निखिल लोहार, रात्री ९ वा. कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ आंबडोस-बुवा गुरुदास कदम पखवाज- अक्षय कदम, रात्री १० वा. नृसिंह संगीत साधना भजन मंडळ ओरोस खुर्द- बुवा अमित मेस्त्री, पखवाज- प्रथमेश राणे, ६ रोजी रात्री ८ वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कुळकरवाडी नं. १ साळेल, रात्री ९ वा. श्री गजानन भजन मंडळ आंबेरी बुवा श्रुष्टी गोसावी, पखवाज- संपदा गोसावी, रात्री १० वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माड्याची वाडी-बुवा ऋषिकेश गावडे, पखवाज-लक्ष्मण गावडे, ७ रोजी नांगरभाट उत्कर्ष भजन मंडळ नांगरभाटवाडी साळेल – बुवा विवेकानंद पेडणेकर, पखवाज-योगेश पवार, रात्री ९ वा. श्री देवी भराडी प्रासादिक भजन मंडळ वाडीवरवडे-बुवा लक्ष्मण धुरी पखवाज- गोविंद भगत, रात्री १० वा. श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप – बुवा ओंकार येरम पोईप, पखवाज-आशिष मेस्त्री, ८ रोजी रात्री ८ वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ जाधववाडी साळेल- बुवा प्रकाश सोनवडेकर, पखवाज राकेश जाधव, रात्री ९ वा. ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ वराड हडपीवाडी- बुवा अमर घोगळे-नयन घोगळे, पखवाज-ओंकार घोगळे, रात्री १० वा. श्रीदेवी भवानी प्रसादिक भजन मंडळ आंबेरी-बुवा अमित डिचोलकर पखवाज-साईश खोत, तबला-केदार डिचोलकर, ९ रोजी रात्री ८ वा. दत्त प्रासादिक भजन मंडळ साळेल कुळकरवाडी नं.१ बुवा- श्रीकृष्ण गावडे, पखवाज- गणेश गावडे, रात्री ९ वा. पांडुरंग भजन मंडळ आंबेरी पखवाज- बुवा समीर मुणगेकर, पखवाज- सोनू मुसळे, रात्री १० वा. श्री देवी आंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ आंदुर्ले, बुवा-विनय नांदोस्कर, पखवाज जितेंद्र मेस्त्री, तबला-जयेश पारकर, १० रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक महिलांचा गरबा नृत्य, रात्री ९ वाजता घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे बुवा-नाना सावंत- पखवाज योगेश सामंत, रात्री १० वा. श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ काळसे- बुवा राहुल कुलकर्णी यांची भजने होणार आहेत. या भजन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक मंडळ तसेच मुंबई निवासी साळेल ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page