जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रकार:आ वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिक झाले आक्रमक..
⚡ओरोस ता.३०-: सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाचे आठ कोटीचे टेंडर मिळण्यासाठी थेट जिल्हा परिषद बांधकाम च्या कार्यालयात बाऊन्सर बसवून कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व ठेकेदार यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आज घडला आहे. ही बाब ठाकरे शिवसेनेला समजताच आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिकांनी बांधकाम विभागात आक्रमकपणे घुसत जाब विचारला. तसेच पोलिसांना पाचारण करून पळून गेलेल्या चार बाऊन्सर यांना पोलीस व शिवसैनिकांनी पकडत जोरदार चोप दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात एखादे काम मिळविण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सरचा उपयोग पहिल्यांदाच झाला आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात खळबळ माजली असून कोणत्या ठेकेदाराने हा प्रताप केला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. तसेच हा प्रकार पर जिल्ह्यातील ठेकेदाराने केला असल्याचेही सांगितले जात आहे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी यातील चार बाऊन्सरला ताब्यात घेतली आहे काही बाउन्सर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत
