Headlines

वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात नवत्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

कणकवली दि. ३० सप्टेंबर

श्री. दुर्गापासक ऐक्यवर्धक संघ श्री. आर्यादुर्गा मंदिर, दुर्गानगर, वागदे यांच्यावतीने आर्यादुर्गा देवीचा नवरात्रोत्सव आश्विन शु. प्रतिपदा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ ते आश्विन शु. नवमी शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वा. घटस्थापना, श्री देवीची महापूजा, चंडीपाठ, कुमारीपुजन , गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ ते शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत होणारे कार्यक्रम – दररोज दुपारी १२ वा. आरती, दुपारी ३ ते ३.३० वा. पुराण वाचन – श्री.पु.वि. काजरेकर, जांभवडे , सायं. ३.४५ ते ५.१५ वा. सुश्राव्य कीर्तन – ह.भ.प.श्री. पुरुषोत्तमबुवा पोखरणकर, पोखरण , सायं. ७.३० ते ८.३० वा. दररोज पालखी प्रदक्षिणा, आरती , सायंकाळी ५.३० ते ७.३० वा. होणारे सांस्कृतिक कार्यक्रम – गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ महापुरुष भजन मंडळ, नागवे ( भटवाडी ) यांचे भजन , शनिवार दि. ५ ऑक्टोबर २०२४ श्री. मुकुंदराव क्षीरसागर जोधपुर यांचे गायन , रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ आदर्श संगीत विद्यालय कणकवली प्रस्तुत शास्त्रीय व सुगम संगीत गायन मैफल ” तेजोमय नादब्रह्म ” , सोमवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी भावगंध रत्नागिरी प्रस्तुत ” भावभक्ती ” नाट्यगीत मैफल , गुरुवार दि. १० ऑक्टोंबर अष्टधान सेवा रात्रौ ८ वा, शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नवरात्रोत्थापणा , दसरा सायं. ४ ते ५ वा लळीताचे कीर्तन , सायं ५.३० वाजता सोने लुटणे , रविवार दि .६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद तरी सर्व भक्तजनांनी उपस्थित राहून देवी दर्शन, व इतर सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page