सायंकाळी होणार थाटात उद्घाटन: पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.२६-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघातील तब्बल सहा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज पार पडणार आहे याची तयारी देखील अंतिम टप्प्यात सुरू असून सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आरोग्यांच्या अपुऱ्या सुविधांना हातभार लावण्यासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी भाजपच्या माध्यमातून पुढाकार घेत तब्बल सहा रुग्णवाहिका सावंतवाडी मतदारसंघात दिल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार असून या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी भाजपच्या माध्यमातून विशाल परब, मनोज नाईक,सुधीर आरीवडेकर, अनिल निरवडेकर, दिलीप भालेकर यांनी केले आहे.

