आडेली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा…!

⚡वेंगुर्ला ता.२५-: श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था ‘गराजलो रे गराजलो‘ आयोजित नवोदित होतकरू कलाकार घडावा या उदात्त हेतूने सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आडेली येथे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खुल्या गटामध्ये ही स्पर्धा होणार असून सुमारे ४ ते ७ मिनिटांत सामाजिक विषयावर सादरीकरण करावयाचे आहे. या स्पर्धेचा निकाल ताबडतोब जाहीर करून पारितोषिक वितरण करण्यात येईल. प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. तर सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. नावनोंदणीसाठी ९७०२०८७९३३ किवा ८७७९३२६६५६ यावर संफ साधावा.

You cannot copy content of this page