केसरकरांनी खोटं बोलण्याचे विद्यापीठ सुरु करावे…

राजन तेली : वरिष्ठांनी आदेश दिला तर निवडणूक लढवून केसरकारांना धूळ चारणार..

⚡सावंतवाडी ता.२१-: मंत्री दिपक केसरकर निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस करतात, परंतु १५ वर्षात प्रत्यक्षात काय केल नाही , त्यामुळे केसरकरांनी आता एक खोटं बोलण्याचे विद्यापीठ उघडावे व त्याचे कुलगुरू हे केसरकरचं व्हावे, अश्या प्रकारची मागणी येथे दोन दिवसात मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मागणी करणार, असल्याची टिका माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केली.दरम्यान गेल्या १५ वर्षात एकही तरूणाला रोजगार देऊ न शकणारे केसरकर जर्मनी २०० तरूणांना काय नोकऱ्या देणार ? असा सवाल ही श्री.तेली यांनी यावेळी उपस्थित केला, असून त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता केसरकरांना जर्मनीत पाठवणार असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला…
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.

श्री.तेली पुढे म्हणाले की, केसरकर गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत ते एकही तरुणांना रोजगार देऊ शकले नाहीत परंतु निवडणुकीच्या तोंडावर मात्र त्यांच्या मोठमोठ्या घोषणांचा पाऊस होतो, गेल्या पंधरा वर्षात जाहीर केलेल्या प्रकल्पांचा काय झालं, आतापर्यंत किती नोकऱ्या तरुणांना दिल्या, हे एकदा त्यांनी जनतेला सांगावे अन्यथा त्यांनी आमने-सामने डिबेट लावावे , असा इशाराही श्री तेली यांनी यावेळी दिला..
दरम्यान वरिष्ठांनी मला जर आदेश दिला तर मी 100% निवडणुकीच्या रिंगणात उतरणार व केसरकारांना धूळ चालणार असे श्री तेली यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page