सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा गांवी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, तालुका उपसंघटक संजय गावडे, मळगांव उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, बुथप्रमुख एकनाथ हळदणकर, शिवसेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून गावांतील महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफु योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या विविध योजनांच्या बाबतीत माहीती देवून मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सौ. श्रावणी नाईक, श्री. आबा नाईक, प्रकाश नाईक, श्री. ऋषिकेश नाईक, दिव्यांका नाईक, माजी सरपंच सौ. रंजना नाईक, श्री. राजन नाईक व महिला लाभार्थी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सातार्डा गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानांतर्गत ग्रामस्थांना सरकारच्या योजनांचे मार्गदर्शन…!
