Headlines

इन्सुलीत २९ रोजी जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.१९-: सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच माध्यमिक अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २९ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे करण्यात आले आहे.

स्पर्धा सकाळी ठीक दहा वाजता सुरू होणार आहे. स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सातवी विषय 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ', 'पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी' हे असून वेळ चार मिनिटे आहे. गट क्रमांक दोन इयत्ता आठवी ते दहावी विषय 'माझा आवडता मराठी साहित्यिक', 'सोशल मीडिया आणि आजचा विद्यार्थी' हे विषय असून वेळ सहा मिनिटे आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या फक्त ३० स्पर्धकांना प्रत्येक गटातून सहभागी होता येईल.
स्पर्धेसाठी दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम २५०१ रुपये, द्वितीय क्रमांक २००१ रुपये, तृतीय क्रमांक १५०१ रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०१ रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर मोर्ये, सचिव राहुल समुद्रे यांनी केले आहे. नाव नोंदणी स्पर्धाप्रमुख संजय शेवाळे मो. 9423305116 स्पर्धा सहाय्यक सौ. विद्या पालव मो. 9146237743 यांच्याकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सोबत स्पर्धकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे पत्र आणणे अनिवार्य आहे.

You cannot copy content of this page