आरोस येथे शिवसेनेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१९-: सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन अभियानांतर्गत मार्गदर्शन आयोजित केले, याचा शुभारंभ आज सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावातुन करण्यात आला..

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” कुटुंब भेट अभियान अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावात शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, संजय पांगम, उपसंघटक संजय गावडे, एकनाथ हळदणकर, शिवसेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून गावांतील महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या विविध योजनांच्या बाबतीत माहीती देवून मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच श्री. शंकर नाईक, माजी सरपंच सौ. साक्षी नाईक, उपसरपंच श्री. प्रसाद नाईक व महिला लाभार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page