सामाजिक उपक्रमाने रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी सावंतवाडी शहरात साजरा होणार…!

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवार सामाजिक उपक्रमांने सावंतवाडी साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी भाजप कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबीर रुग्णांना फळ वाटप,रुग्णालयाला बेडशीट वाटप तसेच धान्य वाटप तसेच विविध समाजपयोगी कार्यक्रम* करून साजरा करण्यात येणार आहे.यासंदर्भात नियोजनाची बैठक आज सावंतवाडी भाजपा तालुका कार्यालय येथे पार पडली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजू परब, भाजपा जिल्हा चिटणीस श्री चंद्रकांत जाधव,जिल्हा निमंत्रित सदस्य श्री मनोज नाईक, सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष श्री अजय गोंदावले, सावंतवाडी शहर सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर, श्री विनोद सावंत, बांदा मंडळ अध्यक्ष श्री महेश धुरी, आंबोली मंडळ सरचिटणीस, श्री प्रमोद गावडे, युवा मोर्चा बांदा मंडळ अध्यक्ष श्री सिद्देश कांबळी,मळगाव 2 शक्ती केंद्र प्रमुख श्री भास्कर मुननकर नेमले बूथ अध्यक्ष श्री सुहास पिकुळकर, श्री प्रवीण वेंगुर्लेकर, सुनील राऊळ तसेच प्रा. श्री गणपत शिरोडकर हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page