एक वर्षाच्या पाडसाचा पाडला फडशा
*💫मालवण दि१०-:* गेले काही दिवस आपल्या मुक्त संचाराने चाफेखोल गावात दहशत माजविणाऱ्या बिबट्याने भर वस्तीत घुसून चाफेखोल येथील सदानंद घाडीगावकर यांच्या मालकीच्या एका वर्षांच्या पाडसाचा फडशा पाडला काल शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला करत दोन वर्षांच्या पाडसाला ठार केल्याची घटना घडली आहे. गेले काही दिवस चाफेखोल गाव परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. काल या बिबट्याने वस्तीत घुसून सदानंद घाडीगावकर यांच्या मालकीच्या एका वर्षांच्या पाडसावर हल्ला करत ठार केले. याची माहिती वनविभागास देण्यात दोन आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. वनविभागाने तत्काळ उपाययोजना करत या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
