⚡ओरोस ता.१६-: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी आज भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांच्या घरी जात श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी श्री विशाल परब यांच्या समवेत माजी नेमळेचे माजी सरपंच श्री विनोद राऊळ, बांदा माजी सरपंच अक्रम खान हे देखील उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी सर्वांचे स्वागत करत आदरातिथ्य केले.
