गणेश उत्सवापूर्वी आंबोलीतील वीज पुरवठा सुरळीत…

मंत्री दीपक केसरकर यांनी स्वखर्चातून पुरविल्या वीज पुरवठा विभागाला गाड्या..

⚡आंबोली ता.०७-: गणेश उत्सव काळात आंबोली येथे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून स्वखर्चातून गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या तोडांवर पावसामुळे आंबोली विभागात वारंवार वीज खंडित होत होती. याबाबत ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचं लक्ष वेधले होते त्यामुळे श्री केसरकर यांनी जनतेच्या मागणीची दखल घेत ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.

You cannot copy content of this page