⚡बांदा ता.०५-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज क्षयरोग लसीकरण सत्र संपन्न झाले. यावेळी अनेकांनी लसीकरण सत्राचा लाभ घेतला.
उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लसीकरण सत्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य सेवक उपस्थित होते.
यावेळी डॉ. सारंग यांनी क्षयरोग व त्यावरील उपाययोजना, घ्यावयाची काळजी व लसीकरण याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. उपसरपंच श्री सावंत यांनी देखील आपण क्षयरोगावर मात करू शकतो. यासाठी वेळेत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण सत्र संपन्न…
