ईन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू वितरित…

बांदा ता.०५-: ईन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त भेटवस्तू वितरित करण्यात आली.

संस्थेच्या १७० दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी शिधा वाटपाचा कार्यक्रम सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, उपसरपंच सौ. वर्षा सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सरपंच विठ्ठल पालव, कृष्णा सावंत, शांताराम बांदिवडेकर, उपाध्यक्ष सहदेव सावंत, सचिव संजय सावंत, खजिनदार सखाराम बागवे, संचालक गीतांजली हळदणकर, रामचंद्र पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नूतन उपसरपंच सौ. वर्षा सावंत यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री पेडणेकर यांनी संस्थेच्या वाटचालीला आढावा घेतला. संस्थेला दहा वर्षे पूर्ण होत असून गोकुळच्या माध्यमातून दरमहा संस्थेच्या वतीने आठ लाख रुपये दूध उत्पादकांना वितरित करण्यात येतात, त्याचबरोबर पशुखाद्य व इतर सुविधा संस्थेच्या वतीने पुरवल्या जातात. दुग्ध उत्पादकांना जिल्हा बँकेच्या वतीने दुधाळ जनावरे खरेदी करण्याच्या दृष्टीने सर्व तो प्रयत्न केले जातात. यासाठी दुग्ध उत्पादकाने या शेतीपूरक शाश्वत व्यवसायाकडे वळून आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. यावेळी दुग्ध उत्पादक शेतकरी सुधीर गावडे, रुपेश परब, कृष्णा परब, वासुदेव हळदणकर, गुरुनाथ हळदणकर, सुभाष पेडणेकर, प्रसाद सावंत, आबा देसाई, संजय पालव, चंद्रकांत पालव, महेश गावडे, रामचंद्र मिस्त्री आदिसह दुग्ध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सचिव संजय सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page