⚡देवगड ता.०५-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा पुरस्कृत व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक 29 जुलै 2024 रोजी सिंधुदुर्ग नगरी,क्रीडा संकुल, ओरोस .येथे संपन्न झाल्या .या स्पर्धेत वाडा हायस्कूल च्या कुस्तीपटूनीं यश संपादन करून ,शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवून, कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला.
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे ४४ किलो वजन गट
१) हर्ष योगेश गावकर – जिल्हास्तर- प्रथम विभागीय निवड, ४६ किलो वजन गट २) कुंजल दिनेश गावकर- जिल्हास्तर – प्रथम विभागीय निवड,५० किलो वजन गट३) निधी कमलेश मोंडे -जिल्हास्तर – प्रथम विभागीय निवड, ५७ किलो वजन गट ४) अंजली अर्जुन महाडिक -जिल्हास्तर – प्रथम विभागीय निवड, ३० किलो वजन गट
१) गार्गी निलेश वाडेकर- तृतीय ,३६ तुला वजन गट
२) श्रावणी शशिकांत वाडेकर- द्वितीय,३९ किलो वजन गट,३) तनया अमोल जोशी- तृतीय,४६ किलो वजन घट
४) वेदिका विजय मुळम- तृतीय,६२ किलो वजन गट
५) भूमी मंगेश राऊळ – तृतीय.
यामधील पुढील खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. १) हर्ष योगेश गावकर, २) कुंजल दिनेश गावकर, ३) निधी कमलेश मोंडे, ४) अंजली अर्जुन महाडिक या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री उत्तरेश्वर लाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे लोकल कमिटीचे ,अध्यक्ष श्री .शांताराम पुजारे, सचिव श्री. डी .व्ही. जोशी ,संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री. सुनील घस्ती ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व वाडा पंचक्रोशीतील पालक वर्गांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो मजकूर
यशस्वी खेळाडू समवेत प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.सुनील घस्ती, ज्येष्ठ शिक्षक श्री. विकास पवार, सौ स्मिता तेली, क्रीडा शिक्षक श्री. उत्तरेश्वर लाड, श्री. सिद्धराम पाटील
छाया वैभव केळकर देवगड
