⚡कुडाळ ता.०१-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ कुडाळ तालुका भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी यापूर्वी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा समाचार घेतला.
मालवण येथील राजकोट किल्लावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यानंतर या कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण सुरू झालं राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला कुडाळ शहरातील भाजप कार्यालयात जवळ निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा चिटणीस विनायक राणे, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, प्रदेश सदस्य सौ संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, भाजपा गटनेचा विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, माजी सभापती अभय परब, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुपेश कानडे, सुनील बांदेकर, बंड्या सावंत, विजय कांबळी, बाळा पावसकर, नागेश परब आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी सांगितले की महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावर राजकारण करीत आहे पण यापूर्वी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली आहेत. ती वक्तव्य सुद्धा आम जनतेला समजणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
कुडाळमध्ये भाजपने केला महाविकास आघाडीचा निषेध…
