पावसाळी क्रीडा स्पर्धेत वेतोरे हायस्कूलचे यश…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यात वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १४ वर्षाखालील मुलींच्या तर १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेत भक्ती कानडे प्रथम तर मुलांमधून अर्थव तेंडुलकर प्रथम, १९ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत सौरभ धारगळकर प्रथम व तेजस वेतोरेकर चतुर्थ, १४ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत साईराज सामंत याने प्रथम क्रमांक पटकावित जिल्हास्तरापर्यंत तर १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय बॅडमिटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक के.डी.खरबडे आणि रविकांत कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page