मालवणच्या बालनाट्य स्पर्धेत रोझरी इंग्लिश मिडीयम स्कुल प्रथम…

मालवण दि प्रतिनिधी
मॅग्रोव्ह फाउंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स भारतीय वनविभाग आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या ‘समुद्रमंथन’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे द्वितीय – हमावणी (शेठ म. ग. हायस्कूल देवगड), तृतीय – तरंगत्या बेटावर (आयडियल इंग्लिश , मीडीयम स्कूल नेरुर), उत्तेजनार्थ शर्यत (विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल), उत्कृष्ट दिग्दर्शन – रंगिला (समुद्रमंथन, रोझरी हायस्कूल मालवण), उत्कृष्ट लेखन – आज्ञा कोयंडे (हमावणी, शेठ म. ग. हायस्कूल देवगड), पुरुष अभिनय – प्रथम धैर्य सामंत (हमावणी, शेठ म. ग. हायस्कूल देवगड), द्वितीय कौस्तुभ पालव (व्यथा समुद्र प्रदुषणाची, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल), तृतीय आयुष चव्हाण तरंगत्या बेटावर, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरुर), स्त्री अभिनय प्रथम – अनुश चौधरी (तरंगत्या बेटावर, आयडियल इंग्लिश स्कूल), मैथिली पवार (हमावणी, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड), द्वितीय- आस्था ओरसकर (समुद्रमंथन, रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल), तृतीय आर्या कुबल (व्यथा समुद्र प्रदुषणाची, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण), तांत्रिक अंगे प्रथम समुद्रमंथन (रोझरी इंग्लिश स्कूल), द्वितीय हमावणी (शेठ म. ग. हायस्कूल), तृतीय- व्यथा समुद्र प्रदूषणाची ( जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल )

यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे गौरव ओरसकर, सुनील परुळेकर मुकेश बावकर, सुधीर कुरले, गौरीश काजरेकर, इको फॉक्स संस्था यांचे परेश पिंपळे उपस्थित होते. परीक्षक म्हणून रवींद्र देवधर, नितीन वाळके, शुभदा टिकम यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page