रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे रायफल शूटिंग स्पर्धेत यश…

⚡मालवण ता.३१-: क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे आयोजित १९ वर्षाखालील मुले रायफल शूटिंग मधील पिप साईट या क्रीडा प्रकारात मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेतील कु. संदेश राम शिर्के याने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून विभाग स्तरासाठी त्याची निवड झाली आहे.

संदेश शिर्के याला प्रा.हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले. संदेश याचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी  अभिनंदन केले.

You cannot copy content of this page