आई मानसिक रुग्ण, मुलगा लहान अशी आहे स्थिती;श्रीकृष्ण सावंत यानी वास्तव मांडले प स सभेत
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे एका गरीब कुटुंबाची विज तोडण्यात आली आहे. यावेळी त्या अधिकाऱ्यांनी माणुसकी न दाखवता विज कनेक्शन तोडण्यात आले आहे. या कुटूंबात दोन माणसे राहत असून, आई मानसिक रुग्ण व मुलगा लहान आहे. यावेळी या कुटूंबाचे वास्तव चित्र पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी सावंतवाडी पंचायत समिती बैठकीत माडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक नवनिर्वाचित सभापती निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली यावेळी गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक,सदस्य मानसी धुरी,प्रियंका केळुसकर,राजश्री नाईक ,लक्ष्मण चव्हाण,पंकज पेडणेकर,रवींद्र मडगावकर,मोहन चव्हाण, रेश्मा नाईक आदि उपस्थित होते. पंचायत समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली यात विज वितरण कंपनीने मध्यंतरी अनेक ग्राहकांच्या विज तोडली होती.यावरून सदस्य बाबू सावंत यांनी विज अधिकाऱ्यांना धारेवर धरले सर्वत्र विजेचा लपंडाव सुरू असतो मग बिले मागायला वेळेत कसे काय येता असा सवाल केला तसेच कोरोना काळात वीज बिल भरायला लोकांकडे पैसे नाही मग तुम्हाला पैसे कसे भरायचे असा सवाल केला. तर दुसरी आरोग्य विभागाच्या आढाव्या वेळी मडगावकर यानी कोरोना केंद्र कुठे आहेत तुम्ही लोकांना माहीती का देत नाही असा सवाल केला तसेच सांगेली येथील नवोदय विद्यालयात रूग्ण मिळाले मग सर्वाची कोरोना चाचणी का करण्यात आली नाही असा सवाल केला सभापती यांनी सर्वाचे अहवाल घेण्याच्या सुचना केल्या.करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरातच ठेवले जाईल असे यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
