Headlines

महिला, मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेची लक्षवेधी योजना

रोप वाटिका व गांडूळ खत निर्मितिचे देणार प्रशिक्षण;मबाक सभापती शर्वाणी गांवकर यांची सभेत माहिती

*💫सिंधुदुर्गनगरी दि०९-:* ब्यूटी पार्लर, टंकलेखन ऐवजी महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून यावर्षी पासून जिल्ह्यातील मूली व महिलांसाठी गांडूळ खत निर्मिती व रोप वाटिका तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. याचबरोबर फॅशन डिझाइन, फळ प्रक्रिया, केटरिंग मेकिंग ही प्रशिक्षणे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सभापती शर्वाणी गांवकर यानी मासिक सभेत दिली. सभापती पदावर बसल्यानंतर सौ गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली महिला व बाल कल्याण समिती सभा बँ नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, सदस्य राजलक्ष्मी डिचवलकर, संपदा देसाई, पल्लवी झिमाळ, सायली सावंत, श्वेता कोरगांवकर, वर्षा कुडाळकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नक्षलवादी हल्ल्यात मृत झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नवीन सभापती, अध्यक्ष यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

You cannot copy content of this page