कणकवली दि.९ -: सध्या कोविडची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा वेळी रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत असते. ही गरज लक्षात घेऊन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्यावतीने संस्थेचे प्रेरणास्थान विद्रोही कवी उत्तम पवार यांच्या जन्मदिनानिमित्त कणकवली बुद्धविहार येथे दि. ९ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरातून सामाजिक संदेश देत दिला उत्तम पवार यांच्या स्मृती जागविल्या रक्तदान शिबिरात ३१ रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदात्यांना ब्लड बँक आणि दर्पण प्रबोधिनी वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.जिल्हा रुग्णालय,सिंधुदुर्ग रक्त केंद्र पथकाने सहकार्य केले.यावेळी रक्तकेंद्र विभागाचे डॉ. योगेश गोडकर, हेमांगी रणदिवे, किशोर नांदगावकर, उल्हास राणे, सुरेश डोंगरे आदी वैद्यकीय पथक होते उपस्थित होते.यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांनीही रक्तदात्यांना आणि आयोजक संस्थेला सन्मानपत्र दिले. यावेळी प्रथमिक शिक्षक संघटनेचे नेते विनायक जाधव ,संतोष कुडाळकर आणि जिल्यातील विविध सामजिक संघटनांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश कदम, सचिव आनंद तांबे, उपाध्यक्ष अनिल तांबे,महेंद्र कदम, सहसचिव विशाल हडकर, डॉ. अशोक कदम, डॉ. व्ही. जि. कदम, डॉ. सिद्धार्थ तांबे, सुनिल तांबे,सिद्धार्थ गो.तांबे, संतोष तांबे, किशोर कदम, नितीन कदम, दिलीप कदम, पी. जी. कदम, संदेश कदम, गौरव कदम, राहुल कदम, विशाल कासले, स्वप्निल भरणकर, निलेश कदम, प्रभाकर चव्हाण, आदी होते उपस्थित
दर्पण प्रबोधिनी रक्तदान शिबिरत ३१ जणांचे रक्तदान
