शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा बैठकीत मागणी:कुडाळ तालुका शहरप्रमुख म्हणून रोहित भोगटे यांची नियुक्ती..
⚡कुडाळ ता.३१-: विधान सभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार स्थानिक असावा.अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या कुडाळ मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीतच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधान सभा मतदार संघ प्रमुख श्री.बबन शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.विश्वास गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी सी.रेस्ट हाऊस कुडाळ येथे पार पडली.
या बैठकीत पक्ष संघटनेतील कमकाजविषयी,पक्षातील ध्येय धोरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कनिष्ठ पदाधिकारी यांच्या व्यथा वरिष्ठ यांच्यापर्यंत पोहोचविण्यात याव्यात.तसेच विधान सभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार स्थानिक असावा.अशी एकमुखी मागणी वजा ठराव या बैठकीत घेण्यात आला.तसेच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख .संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीम.नीलमताई शिंदे,जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी,आशिष नाबर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ.सोनाली पाटकर,युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर,शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघप्रमुख बबन शिंदे,शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख .योगेश तुळसकर,.अरविंद करलकर,शिवसेना तालुका संघटक.अनिकेत तेंडोलकर,.रमेश हरमलकर शिवसेना मालवण तालुका समन्वयक तथा देवबाग सरपंच.उल्हास तांडेल,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजेंद्र गावकर, महेश राणे,महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.दीक्षा सावंत, युवासेना मालवण तालुकाप्रमुख अभिषेक कांदळगावकर,युवतीसेना तालुकाप्रमुख सौ.गायत्री गोलम,श्रीम.मधुरा तुळसकर,शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे,शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर,शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख सौ.अनघा रांगणेकर,शिवसेना शहरप्रमुख.रोहित भोगटे,शिवसेना मालवण शहरप्रमुख श्री.बाळू नाटेकर,युवतीसेना शहरप्रमुख श्रीम.प्रियांका मेस्त्री,शिवसेना महिला आघाडी विभागप्रमुख तेंडोली सौ.शुभांगी तेंडोलकर,शिवसेना महिला आघाडी नेरूर कु.शिल्पा आचरेकर, वेताळबांबार्डे विभागप्रमुख प्रवीण मर्गज, तेंडोली विभागप्रमुख राजेश तेंडोलकर,सतीश सावंत, पिंगुळी विभागप्रमुख महेंद्र सातार्डेकर,शिवसेना पावशी विभागप्रमुख जयदीप तुळसकर,उपविभागप्रमुख तथा ज्येष्ठ शिवसैनिक रामकृष्ण मामा गडकरी, राष्ट्रीय कामगार सेना सदस्य रुपेश नाईक,शाखाप्रमुख नरेंद्र नेरूरकर,दिवाकर जळवी,विठ्ठल शिंदे, बुथप्रमुख रुपेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य देवबाग दत्तात्रय केळुसकर, बूथप्रमुख रुपेश पेडणेकर,माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर,किशोर सावंत,सतीश सावंत,सौ.पल्लवी चव्हाण,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
