वारंवार येणाऱ्या पालकमंत्र्यांना कोणी पाहिले का..?

कुणाल किनळेकर:मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अकार्यक्षम पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा..

⚡कुडाळ ता.३१-: नगरपंचायत निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक असो वा आत्ताच झालेली लोकसभा निवडणूक असो सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार निवडणुकीपुरते हिरीरीने दौरा करणारे राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सोपस्कार केल्यागत काही काळासाठीच पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना कोणी परत पाहिलं का ? असा सवाल मनसेचेउपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी विचारला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. किनळेकर म्हणतात, गेल्या वर्षी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गाचे अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना मनसे स्टाईल खळखट्याक समज दिल्यावर मनसैनिकांना उपदेशपर पत्र लिहिणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या निकृष्ट कार्यपद्धतीमुळे जी राजकोट येथे दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने उद्घाटने केली गेलेली रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामांचा दर्जा जर निकृष्ट असल्यास भविष्यात अपघात होऊन मोठी वित्त व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना अशा अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा घेण्याबाबत पत्र लिहिण्याची वेळ सिंधुदुर्गवासियांवर आलेली आहे., असे श्री. किनळेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page