⚡वैभववाडी ता.३०-: ग्रामपंचायत नावळे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व पी के एल वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर तपासणी शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 10 ते 2 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय नावळे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान नाक घसा शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, रक्त तपासण्या आधी तपासण्या होणार असून अधिक माहितीसाठी संपर्क सरपंच सोनल गुरव मोबाईल नंबर 94 20 16 66 83, उपसरपंच संजय रावराणे 94 22 37 93 45, ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके 940 33 66 9 17 रश्मी गुरव 75 88 25 12 71 स्नेहा शेळके 95 52 06 39 94 व ग्रामसेवक अनिल घुगे 808024761 तरी या आरोग्य शिबिराला नावळे गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान सरपंच सोनल गुरव व उपसरपंच संजय रावराणे यांनी केले आहे.
