१ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील मालवणात…

सिताराम गावडे:मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:

⚡सावंतवाडी ता.३०-: मराठा समाजाचे नेते मराठा ऋदय सम्राट मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबर रोजी मालवण राजकोट येथे येऊन हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली दशा प्रत्यक्ष भेट देऊन १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या नियोजित वेळेनुसार पाहणी करणार आहेत त्यानंतर सकाळी १० वाजता मराठा समाज भुवन कुडाळ येथे जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे यावेळी मराठा समाज बांधवांनी व छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदुं बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.


राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाईगडबडीत उभारण्यात आला,अगदी नवख्या शिल्पकाराला हा ठेका देण्यात आला हा ठेका देताना कोणाची मर्जी सांभाळण्यात आली,याचा शोध घेणे गरजेचे आहे,या सगळ्या घटनेचा आढावा घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मालवण राजकोट येथे येत आहेत त्यानंतर त्यांची मराठा समाज भवन कुडाळ येथे जाहिर सभा होणार आहे तरी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page