अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री विरोधात शिवसेना महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा-:विवेक ताम्हणकर…

⚡देवगड ता.३०-:
देवगड तालुक्यातील अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याने पोलिस प्रशासनाचा वचक नाही. यामुळे हे व्यवसाय करणारे व्यावसायिक बळावले असून त्यांच्यावर आठ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.यावेळी गणेशोत्सवापुर्वी दारूचा टँकरच तालुक्यात दाखल होणार असून याविरोधात तुम्ही काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केला.अवैध दारू धंद्या विरोधात शिवसेना महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी देवगडमध्ये मोर्चा काढण्यात आला.जागे व्हा जागे व्हा पोलिस प्रशासन जागे व्हा.दारूधंदे बंद करा अशा घोषणांनी देवगड निनादुन गेले.

देवगड तालुक्यातील अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई करा अन्यथा ३० ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे पोलिसांना देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता उबाठा शिवसेना युवासेना बरोबरच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले राष्टड्ढवादी, काँग्रेस, आप या पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह देवगड कॉलेजनाका येथून भव्य मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा बाजारमार्गे राज्य उत्पादन शुल्क देवगड कार्यालयावर धडकला.या मोर्चामध्ये युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्टआवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, शिवसेना तालुकाप्रमुख मिलींद साटम, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, निनाद देशपांडे, महिला तालुका संघटक सौ.हर्षा ठाकूर, सौ.सायली घाडीगावकर, नगरसेवक बुवा तारी, सुनिल तेली, प्रसाद दुखंडे, संदीप डोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अवैध दारूधंदे करणाऱ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, बंद करा बंद करा दारूधंदे बंद करा तसेच शासनाविरोधात घोषणा देत हा मोर्चा कॉलेज नाका ते राज्य उत्पादन शुल्क देवगड कार्यालयापर्यंत काढण्यात आला.शुक्रवारी आठवडा बाजार असल्याने देवगडमध्ये रस्त्यावर वर्दळ होती यामुळे मोर्चावेळी प्रभारी पोलिस अधिकारी मनोज सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शुक्रवारी आठवडा बाजारातूनच हा मोर्चा उत्पादन शुल्क कार्यालयावर जावून धडकला. मोर्चावेळी ठिकठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.उत्पादन शुल्क कार्यालयाजवळ मोर्चा गेल्यानंतर भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले.राष्टवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनीही दारू व्यवसामुळे युवा पिढी बरबाद होत असून गोवा बनावटीच्या दारूमुळे मच्छिमारी नौकांवरील खलाशीही भेसळयुक्त दारू प्राशनाने मृत्यु झाल्याचा घटना घडत आहेत.त्यामुळे दारूधंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दारू व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याने त्यांच्यावर कोणाचाही वचक नसून पोलिस यंत्रणेवरही दबाव आहे.अंमली पदार्थांचा विळखाही वाढला असून यामध्ये युवापिढी बरबाद होत आहे.गेल्या सहा महिन्यात हायवेवर झालेले युवावर्गाचे अपघात हे याच कारणातुन झाले आहेत याची माहिती पोलिस, उत्पादन शुल्क या विभागाने घ्यावी व राजकीय दबाव जुगारून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

You cannot copy content of this page