मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड…

गणेश नाईक बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा तर श्रृती जाधव कॅरम स्पर्धेत तिसरी…

⚡सावंतवाडी ता.३०सहदेव राऊळ-: क्रीडा व युवक संचनालय पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी कार्यालय आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या कुमार गणेश सुभाष नाईक याने १९ वर्षे वयोगटात बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक तर १७ वर्षे वयोगटात कुमारी श्रृती भिसाजी जाधव हिने कॅरम स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. या दोन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष श्री शिवराम मळगावकर, कार्याध्यक्ष श्री नंदकिशोर राऊळ, सचिव श्री आर. आर. राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन श्री मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मारूती फाले,पर्यवेक्षक श्री सुनील कदम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page