*💫बांदा दि.०९-* शेर्ले-कापईवाडी येथे परप्रांतीय केरळीयन युवकाचा झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबतची माहिती शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी दिली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. टॉवेलच्या साहाय्याने युवकाने गळफास लावून घेतला. बांदा पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत. युवकाची ओळख अद्याप पटली नसून ओळख पाठविण्याचे काम सुरू आहे.
शेर्ले-कापईवाडी येथे केरळीयन युवकाने लावला गळफास…
