चौकुळ गावचा जमीन प्रश्न येत्या पंधरा दिवसात निश्चितपणे मी सोडवणार…

मंत्री दिपक केसरकर:तिन्ही गावांचा जमिन प्रश्न निवडणूक आचारसंहितेपूर्वी सोडवला जाईल:मात्र काही जण या प्रश्नात राजकारण करत आहे..

⚡सावंतवाडी ता.२६-: चौकुळ गावचा जमीन प्रश्न हा येत्या पंधरा दिवसात निश्चितपणे मी सोडवणार आहे. या गावची समिती यांनी आपल्या गावचा आराखडा तयार करावा त्यानुसार जमिनीचे वाटप केले जाईल असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या गाव हा माझा जवळचा गाव आहे त्यामुळे या प्रश्नासंदर्भात मी गेली कित्येक वर्षापासून झगडत आहे तिन्ही गावांचा जमिनीचा प्रश्न निश्चितपणे निवडणूक आचारसंहितेपूर्वी सोडवला जाईल मात्र या जमीन प्रश्नात कोणी राजकारण करत आहे हे सर्वांना माहीत आहे असेही ते म्हणाले

You cannot copy content of this page