शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २८ रोजी निषेध मोर्चा…

⚡मालवण ता.२६-: मालवण राजकोट येथे ४ डिसेंबर २०२४ रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आज अचानकपणे कोसळून उध्वस्त झाल्याने प्रत्येकाच्या मनात संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. या दुर्दैवी प्रकारच्या निषेधार्थ व यामागील जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. भरड नाका ते बाजारपेठ मार्गे ते तहसील कार्यालय मालवण असा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page