माजी विद्यार्थ्यांनी भरून काढली कमतरता ः सर्वस्तरातून समाधान
*💫बांदा दि.०८-:* सावंतवाडी तालुक्यातील असनिये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झेरॉक्स मशीन, प्रिंटर व स्कॅनरची भासत असलेली कमतरता 2004-05 च्या बॅचने भरून काढली आहे. सर्वांच्या सहकार्यातून शाळेस दिलेल्या मशीनमुळे विद्यार्थ्यांची झेरॉक्ससाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. असनिये शिमगोत्सवादरम्यान माजी विद्यार्थी प्रितेश ठिकार, सुप्रिया सांवत, सारीका सावंत, प्रियांका सावंत, चंदन नाईक, प्रतिक्षा ठिकार, प्रणय सावंत, अजय ठिकार, सुचिता सावंत, स्मिता दामले, जगदीश सावंत, भूषण सावंत, स्वप्नाली घोगळे, दिलीप असनकर, शीतल सावंत, महेश ठिकार, छाया सावंत, वल्लभ बर्वे, समीर सावंत, सुप्रिया एस.सावंत आदी विद्यार्थ्यांनी ठरावित रक्कम गोळा करून शाळेस झेरॉक्स मशिन वजा प्रिंटर व स्कॅनर प्रदान केला. मुख्याध्यापक मृणाली पालव यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आभार मानले. तसेच गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना होणारी अडचण दूर झाली असून शाळेला दिलेली भेट आमच्यासाठी अनमोल असल्याचे सांगितले. यावेळी उपशिक्षक भारती देसाई, श्री.खरात, श्री.आत्राम व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
