सरपंच समीर गावडे यांच्याहस्ते झाले वाटप
*💫बांदा दि.०८-:* निगुडे ग्रामपंचायती तर्फे १४ वित्त आयोगातून निगुडे देऊळवाडी अंगणवाडी, निगुडे गावठणवाडी अंगणवाडी, तसेच निगुडे जाधववाडी अंगणवाडी, येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीतर्फे गणवेश व बेबी वजन काटा तसेच निगुडे जिल्हा परिषद शाळा यांना वॉटर फिल्टर व आशा सेविकांना प्रथम उपचार पेटी असे साहित्य निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका अंजली राणे, रंजना सावंत व नूतन निगुडकर तसेच पालक उपस्थित होते
