गेळे सरपंच सागर ढोकरे:मंत्री केसरकर जमिनीपासून दूर ठेवत आहेत..
⚡सावंतवाडी ता.२२-: गेळे गाववासयाने आमची समिती नियुक्त केली आहे.ही समितीच काय तो निर्णय घेईल, खोटे बोलणे आणि आमची गाववासी आमची साधेपणाचा फायदा घेणे हे आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थांबवावे,असे मत सरपंच सागर ढोकरे यांनी नाव न घेता आज येथे केली.
दरम्यान यापुढे या गावाच्या जमीन प्रश्न संदर्भात प्रशासनाने आम्हाला निमंत्रण द्यायला हवे आणि ते सुद्धा समितीला नियुक्त केलेल्या तरच आम्ही बैठकीला जाऊ असे सरपंच सागर ढोकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की हा जमिनीचा प्रश्न म्हणजे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आम्हाला या जमिनी प्रश्नापासून दूर करण्याचे पाप श्री केसरकर करत आहेत असे त्यांनी नाव न घेता टीका केली.
