टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षका ज्योती तोरसकर यांचे सेट परीक्षेत यश…

सहाय्यक प्राध्यापक परीक्षेत राज्यातून झाल्या प्रविष्ट

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूल मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून गेली वीस वर्षे कार्यरत असलेल्या सौ.ज्योती रविकिरण तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात यश मिळवले आहे. सदर परिक्षा ही युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेतली जाते. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या सदर परीक्षेस सर्व विषया साठी ६१,११४ विद्यार्थी गोवा व महाराष्ट्र राज्यातून प्रविष्ट झाले होते .यापैकी फक्त ४११४(६.७३%) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सदर परीक्षेत इतिहास या विषयात सौ.ज्योती तोरसकर यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. फोटो- सौ. ज्योती तोरसकर

You cannot copy content of this page