कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय ;उपचार, लसिकरण यासाठी करणार प्रयत्न
*💫मालवण दि.०८-:* राज्य शासनाने सुरु केलेली “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी” मोहिमेनुसार कोरोना रुग्णांवर उपचार आणि लसीकरण केले जात आहे. त्याच धर्तीवर मालवण तालुक्यात व शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गतवर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता तालुक्यातील नागरिकांसाठी शिवसेनेने “माझा तालुका- माझी जबाबदारी” हि मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये हेल्पलाईन नंबरशी संपर्क साधून अत्यावश्यक रुग्णसेवा आणि कोरोना बाबतची अधिक माहिती नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन मालवण तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. गतवर्षीच्या कोरोना लढ्यात कोरोना योद्धांच्या कर्तुत्वाने आणि मालवण तालुका व शहरवासीयांनी दाखविलेल्या धैर्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासन यशस्वी झाले होते. परंतु, पुन्हा या रोगाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी पुन्हा खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक सैरभैर होतात. कोणत्या दवाखान्यात जागा उपलब्ध आहे, कोठे उपचार मिळतील, कोठे ऑस्कीजन व व्हेंटीलेटरची सुविधा असलेले बेड उपलब्ध आहेत, रुग्णवाहिकेची गरज भासल्यास कोणाला फोन करायचा, यासह इतर अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. नागरिकांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता शिवसेनेशी संपर्क साधावा. कोरोना विरुद्धच्या लढ्यात मालवण तालुका व शहरवासियांसाठी “माझा तालुका – माझी जबाबदारी” ही हेल्पलाईन मोहीम शिवसेना मालवण तालुक्याच्या वतीने राबविण्यात येत आहे. अत्यावश्यक रुग्णांना बेडची व्यवस्था, रुग्णवाहिका, क्वारंटाईन सेंटर, उपचार आदी बाबत सविस्तर माहिती आणि मदत या हेल्पलाईन द्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला आघाडी समन्वयक पूनम चव्हाण यांनी दिली. यासह कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक सामाजिक कार्यात अग्रभागी आहेत. सामाजिक बांधिलकी जपून शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शिवसेनेचे मदत कार्य सुरु राहील, या परीस्थित शिवसेना मालवण तालुकावासीयांच्या सोबत आहे. कोरोनोच्या धर्तीवर शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोरोनो पासून संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना व काळजी नागरिकांनी घ्यावी, तसेच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, कोरोनोची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी घाबरून जावू नये, तातडीने शिवसेनेच्या हेल्पलाईन किंवा नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. माझा तालुका – माझी जबाबदारी हेल्पलाईन नंबर:- बबन शिंदे:-9422596778, हरी खोबरेकर:-94041 65209, महेश कांदळगावकर:-98238 56769, गणेश कुडाळकर:-9420275787, बाबी जोगी:-9404827200, श्र्वेता सावंत:-9422373492, पुनम चव्हाण:-94046 89316, किरण वाळके:-9421236489, बाळु नाटेकर:-93704 25990, तपस्वी मयेकर:-94045 98281, संन्मेश परब:-9422552128, आतु फर्नांडिस:-9404753033 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
